हम ड्रायवर रुक गए ना तो देश रुक जाएगा ये है ड्राइवर की ताकत होश में आवो होश में लाखो ‌‌

सोशल

‌‌

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर ‍‌ ‌

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहन चालक मालक मित्रांना कळविण्यात येते की दि.09/01/2024 रोजी रात्री 12:00 वाजता पासून बेमुदत बंद चे आव्हान केले आहे तरी आपण सर्वानी या बंद ला चांगला प्रतिसाद दिला तर हा काळा कायदा रद्द होऊ शकतो.नाही तर मरण आपलेच आहे. मित्रांनो आपण कोरोना काळात घरात राहून जी ही रुखी सुकी भाकर खाल्ली तोही दिवस निघून गेला.आता तर हि आपल्या अस्तित्वातवाची लढाई आहे.हा थोडा काळ जर तुम्ही काढला तर नक्की विजय आपलाच होईल.मित्रांनो फक्त तुमची साथ महत्त्वाची आहे. आपण जर हार मानली तर यांची हिम्मत आणखी वाढेल यानंतर सांगता येत नाही आणखी कोणता नवीन नियम लागू करेल याकरिता तुम्हास कळकळीची विनंती करतो.यांना निवडून देणारे मतदार पण आपणच आहोत.तुम्ही जर यांच्या सभेला किंवा निवडणुकीला आपले वाहन भाड्याने दिले तर यांचा समज असा होईल की केन्द्र सरकारने जो हिट & रण हा कायदा लागू केला तो या जनतेला मान्य आहे म्हणूनच श्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे दौरे नियोजित केले आहे या अनुषंगाने तुमच्या वाहन चालक मालकात या कायदयाविषयी कुठल्या प्रकारची भिती निर्माण झाली की नाही. मुख्यमंत्री साहेबांचा हा दौरा यशस्वी झाला की राज्य सरकार लगेच निर्णय घेऊन कायदा लागू करेल. याचा विचार तुम्ही आजच करा हि केन्द्र सरकारची चाल आहे. बघा बातम्यानवर गृह सचिवांनी असे वक्तव्य केले होते की वाहन चालक मालकांना विश्वासात घेऊनच या काळया कायदयामधे सुधारणा करण्यात येईल. असे बोलताच आपले वाहन चालक मालक आपल्या कामावर गेले.व लगेच 24 तासाच्या आत हा कायदा राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने पारीद केला.एवढामोठा विश्वासघात सरकार करु शकते.हे तर राज्य सरकार आहे. ते काय आपला विचार करेल. याचा विचार करूनच आपण आपली वाहने भाडेतत्त्वावर दयायची की नाही दयायची हे आपण स्वःताहच ठरवा.आपण आपली वाहने जर भाड्याने दिली तर आपण स्वःता हा कायदा आपल्यावर आजीवन लागु करून घेऊ.आपलाच वाहन चालक मित्र बाळूभाऊ मादनकर तलोधी बा.तालुका नगभिड जिल्हा चंद्रपूर

CLICK TO SHARE