तेरवीच्या खर्चाला फाटा देत सिंधुताई सपकाळ फाऊंडेशनला ५१०००/-हजार रुपयांचा धनादेश

अन्य

प्रतिनिधी:हिंगणघाट ब्यूरो

तेरवीच्या खर्चाला फाटा देत सिंधुताई सपकाळ फाऊंडेशनला ५१०००/-हजार रुपयांचा धनादेश देत ठाकरे परीवार यांनी घातला आदर्श नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हिंगणघाट येथील ठाकरे परीवाराने आपल्या आईच्या निधनानंतर तेरवीचा बडेजाव न करता अनाथांची माय म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या स्व.सिंधुताई सपकाळ यांच्या फाऊंडेशनला ५१०००/(एक्कावन हजार रुपये) देणगी देत समाजापुढे आदर्श निर्माण केला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी टिळक वार्ड हिंगणघाट येथील श्रीमती राधिकाबाई मधुकरराव ठाकरे यांचे वयाच्या ८०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांची मुले जयंतभाऊ, अनंताभाऊ, गुणवंतभाऊ, यशवंतभाऊ ठाकरे या चारही भावंडांनी समाजोपयोगी निर्णय घेत पारंपरिक रितीरिवाजाला फाटा देत तेरवीला होणारा खर्च टाळत ५१०००/-(एक्कावन हजार रुपये) सिंधुताई सपकाळ फाऊंडेशनला प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे फाऊंडेशनच्या प्रमुख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई यांना त्यांच्या पुणे येथील कार्यालयात स्वतः जाऊन गुणवंतभाऊ ठाकरे व मोहनभाऊ कठाणे यांनी ५१०००/-हजार रुपयांचा धनादेश प्रदान करीत आपले सामाजिक दायित्व पार पाडले….. विशेष म्हणजे यासोबतच ठाकरे परीवाराने आईच्या मृत्यूनंतर आपल्या आईचे डोळे सुद्धा दान केलेले आहे.ठाकरे परीवाराने केलेल्या या आदर्श व प्रेरणादायी अशा कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातुन त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

CLICK TO SHARE