पालडोह शाळेत पोलीस स्थापना दिवस साजरा

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह चंद्रपूर जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा या शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना समाजात वावरताना कसे उपयोगी ठरेल हा उद्देश ठेऊन शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. या पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून शाळेत मुलींनी “गुड टच व बॅड टच” (चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ) या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी टेकामांडवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र मैसेकर यांनी शाळेत हजर राहून शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले.

CLICK TO SHARE