आम्ही भारतीय तर्फे रक्तदान शिबीरात 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अन्य सोशल

प्रतिनीधी:हिंगणघाट ब्यूरो

हिंगणघाट:संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीनिमित्ताने आज दि 28 डिसेंबरला आम्ही भारतीय द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन गीता मंदिर हिंगणघाट येथे घेण्यात आले. या शिबिरात सेवाग्राम हॉस्पिटल येथील तज्ञ डॉकटरांची चमू आली होती. यावेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. या प्रसंगी शहरातील मान्यवर वणा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ निर्मेश कोठारी, रुग्णमित्र गजू कुबडे, व आदर्श शिक्षक गोपाळ मांडवकर या तिघांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने तसेच नामवंत खेळाडू सुबोध महाबुधे यांनी आजवर 97 वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा मंडळातर्फे स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिबिरात रक्तदान करणाऱ्या चाळीसही रक्तदात्यांचे आभार यावेळी संस्थेच्या वतीने मानण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत ठाकरे यांनी केले. मोहन कठाणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही भारतीयांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तभा वृत्तसेवा )यांनी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE