बंदुकीच्या धाकाने पेट्रोलपंपावर दरोडा

क्राइम

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

राजुरा सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून एक लाख ९० हजार रुपये पळविल्याची थरारक घटना राजुरा वरुर रोडवरील साईकृपा पेट्रोलपंपावर घडली. या घटनेने राजुरा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर दिनबाग तांडा यांच्या मालकीचे साईकृपा पेट्रोलपंप आहे. ६ जानेवारीला रात्रीपासून सुरक्षारक्षक तैनात होता. दरम्यान, पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच व्यक्ती अचानक पंपावर आले. बंदुकीचा धाक दाखवून तेथील सुरक्षारक्षकाकडून चावी हिसकावली; तसेच पंपावरील विक्रीची एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले.

CLICK TO SHARE