50 हजार रुपयांपर्यंत दंड

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. या वाढीव दंडाची तरतुद 1 जानेवारी 2024 पासून सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

CLICK TO SHARE