निसर्ग साथी फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र यांचा संयुक्त विद्यमाने विद्यार्थांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सोशल

प्रतिनिधी: करीम खान हिंगणघाट

हिंगणघाट:हिंगणघाट येथील वन्यजीव, पक्षी, निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत निसर्गसाथी फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षिमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती मिळावी, शहरात नवीन पक्षिमित्र व अभ्यासक तयार व्हावेत, यास्तव शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येत्या १४ जानेवारीला जी. बी. एम. एम. विद्यालयात सकाळी 11 वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याकरीता विषय इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांकरीता *’पक्षांची निसर्गातील भुमिका’* तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता *’पक्षी अभ्यासातील डॉ. सालीम अली यांचे योगदान’* या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धकांचे भाषणे झाल्यावर सर्वांसाठी महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे वर्धा जिल्ह्यातील पक्षी वैभव तसेच पक्षी जीवनाचे गूढ उकलून पक्षी प्रजातींच्या माहितीचे चित्रमय सादरीकरण होईल. यात महाराष्ट्र पक्षिमित्राच्या नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे सादरीकरण व माहिती देणार आहे. यासोबतच स्पर्धकांना निसर्गसाथी तर्फे निसर्गातील पक्षी निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी त्यांची सहल आयोजित करून स्पर्धकांना अनेक देशी, विदेशी पक्षी निसर्गात पाहण्याची व निरीक्षण करण्याची संधी मिळेल.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हर्षल गायकवाड साहेब मुख्याधिकारी न. पा हे भूषविणार आहे या स्पर्धेत शहरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडू व महाराष्ट्र पक्षीमित्राचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा यशस्वीेतेसाठी सर्वश्री प्रभाकर कोळसे, प्रा.बालाजी राजूरकर,नियाजुदिंन सिद्दिकी, राजश्री विरुळकर ज्ञानेश्वर चौधरी ,सचिन चरडे, मनोज गायधने,नितीन सिंगरू,चैतन्य वावधने,प्रशांत भोयर प्रा.सुलभा कडू इत्यादी परिक्षम घेत आहे.

CLICK TO SHARE