तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव
राष्ट्रीय युवा महोत्सव दरवर्षी 12 ते 16 जानेवारी यादरम्यान साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाच्या 12 जानेवारी हा दिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.27वा राष्ट्रीय युवा महोत्सव यावर्षी महाराष्ट्र नाशिक येथे आयोजित केला गेला आहे .याचे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे .या युवा महोत्सव चे थीम *विकसित भारत @2047 युवावो के लिए युवा ओके द्वारा* ही आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नाशिक द्वारे एम एस आयुर्वेद महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. प्राचार्या डॉक्टर जयमाला शिर्के यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून पूजन केले. या कार्यक्रमांमध्ये या युवा विद्यार्थी यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन पर व्याख्यान राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर डेमेंद्र कुमार ठाकरे यांनी केले .स्वतःमध्ये असलेल्या युवाशक्तीच्या वापर वैधानिक कामासाठी वापरण्याच्या संकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले .या कार्यक्रमांमध्ये 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.