सास्तीत मातीकाम करणाऱ्या चढ्ढा कंपनी विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी…राजुरा, १२ जाने. : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा ओपनकास्ट माईन नव्याने सुरू करण्यात आली असून त्यात माती व कोळसा काढण्याचे कंत्राट चढ्ढा या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या कंपनीत स्थानिकांना नोकरीत डावलले जात असल्याने आज सकाळपासूनच सास्ती ग्रामपंचायत चे पदाधिकारी गावकऱ्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलन केले.सास्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुचिता मावलीकर, उपसरपंच सचिन कुडे, भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर नरड यांचेसह ग्रामपंचायत चे पदाधिकारी व नागरिक धोपटाळा कोळसा खाणीच्या प्रवेशद्वारा जवळ ठिय्या आंदोलन मांडले. यापूर्वी अनेकदा सांगूनही कंपनी स्थानिकांना नोकरीत सामावून घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला आहे.गावाला लागूनच असलेल्या या खाणीच्या माती व कोळसा वाहतुकीचा सर्वाधिक त्रास ग्रामवासीयांना होत असुन खाणीत होणारी ब्लास्टिंग ने ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले असतानाही कंपनी याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे. कंपनीने निदान शंभर तरी गावातील बेरोजगार युवकांना काम द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सास्ती कडून करण्यात आली आहे. मात्र सायंकाळ पर्यत चर्चा होऊनही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. यावेळी पोलीस या वर लक्ष ठेऊन आहे.“कंपनीच्या माती उत्खननाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे. त्यावर उपाययोजना करून गावातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे भाजपचे जेष्ट नेते मधुकर नरड तसेच उपसरपंच सचिन कुडे यांनी बोलताना सांगितले.”यावेळी आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम नळे, मनोज सिडाम, दिपीका जुलमे, सुनीता भोगेकार, पुजा गुंटी तसेच मारोती लांडे, गणपत काळे, क्रिष्नाअवतार संभोज, निलकंठ सकिनाला, किशोर देरकर, आनंद मांडवकर, सुमन जंगलीवार, रोहित वैरागडे, सचिन निरांजने, सुनिल नळे, सागर तोटावार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE