बल्लारपूर येथे स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालितबल्लारपुर आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजशास्त्र ,सांस्कृतिक विभाग तसेच सैन्य विज्ञान विभागाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले . महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ कायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना युनिव्हर्सिटी चे सिनेट सदस्य श्री. यश बांगडे, श्री. चिन्मय भागवत संघटन मंत्री एबीविपी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण ,समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा, प्रा. योगेश टेकाडे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, स्वामी विवेकानंद, माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलित करून झाली. कार्यक्रमाला संबोधन करताना चिन्मय भागवत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून एक समाजाचा नागरिक या नात्याने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी कसा हातभार लावला पाहिजे यावर प्रकाश टाकला. तसेच श्री. यश बांगडे यांनी कठोर परिस्थिती चा सामना करून थोर व्यक्ती यशाची शिखरे गाठत असतो म्हणून कठोर परिस्थितीला न घाबरता विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे यांनी शिकागो परिषदेतील स्वामीजींनी गाजवलेली जागतिक धर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिवस का साजरा केला जातो, त्याचा उद्देश इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. टेकाडे यांनी माता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आजची स्त्री ही सुद्धा जिजाऊ होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रा. बोबडे यांनी माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या दोन कविता विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या.तर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बादलशहा चव्हाण यांनी आई जिजाऊ या स्त्री जीवनाच्या प्रेरणा स्थान होत्या. तसेच स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा आणि देशाचा विकास साधण्यास हातभार लावावा असे विचार मांडले तर महाविद्यालयातील डॉ. पंकज कावरे ग्रंथालय विभाग प्रमुख यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाची प्रदर्शनी भरवली.कार्यक्रमाला प्रा. स्वप्निल बोबडे, प्रा.डॉ.फुलकर, प्रा. डॉ.मंडल,प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.डॉ.कवाडे ,डॉ.कावरे,प्रा.डॉ.किशोर चौरे,प्रा.कर्णासे, प्रा. पंकज नंदुरकर,प्रा.श्रद्धा कवाडे,प्रा.भगत आणि शिक्षकेतर कर्मचारी अशोक गर्गेलवार, प्रकाश मेश्राम, सिद्धार्थ मोरे श्यामराव दरेकर, अश्विनी वाघ, विशाल पारधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पंकज कावरे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कु. गायत्री तर प्रास्ताविक कुमारी जेसिका इंग्लिश कॉमर्स ज्युनिअर यांनी केले.

CLICK TO SHARE