नायलॉन मांजा आढळल्यास कडक कारवाई

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

चंद्रपूर जानेवारी महिन्यात देशात अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो. राष्ट्रीय हरितलवादानं पतंग उडवण्यासाठी नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे.तरीही काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई केली जाईल.

CLICK TO SHARE