महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे विश्वस्त संजय हरणे यांचे निधन

अन्य

प्रतिनिधी: नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपुर महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे विश्वस्त संजय हरणे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. माता महाकाली महोत्सव ट्रस्टचे सक्रीय माता भक्त कायमचा गमावला असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातुन व्यक्त केली आहे संजय हरणे हे चंद्रपूरातील एक प्रसिद्ध नामवंत हॉटेल व्यवसायीक होते. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. चंद्रपूरात सुरु झालेल्या माता महाकाली महोत्सवाच्या सुरवातीपासूनच ते या महोत्सावाशी जुळले होते. ते माता महाकालीचे परम भक्त होते. रात्री 1 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता बिनबा गेट येथील शांती धाम येथे त्यांच्या वर अंत्यविधी पार पडणार आहे.

CLICK TO SHARE