प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा
वर्धा :- विदर्भ युवा पदमशाली समाज हिंगणघाट तर्फे हिंगणघाट शहरातील पत्रकारचे अपहरण केल्यावरून बनावट बयानाच्या आधारे हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक यांनी खोटे गुन्हे दाखल केले.दी.12/1/2024 ला पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली व या प्रकरणात आपल्या कडुन हस्तक्षेप करून चौकशीची मागणी केली.विक्की कोटेवार याला न्याय दयावा त्यावरून पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलीस उप अधीक्षक डॉ.सागर केवडे यांच्या कडे प्रकरण दिले.या विषयावर सविस्तर चर्चा करून विक्की शाहु व सोनु आर्या यांनी पोलिसांना दिलेले बयान बनावट असुन,खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच सोनु आर्या, विक्की शाहु यांचा पोलीस रेकॉर्ड लक्षात घेता चौकशी तसेच उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक मारोती मुळक यांच्या तपासात लक्ष देऊन चौकशीचे आश्वासन दिले यावेळी पदमशाली समाजाच्या कडुन नरेश पंपनवार(अध्यक्ष )शाम इडपवार (समाज सेवक )अशोक पिठ्ठलवार, राजेश्वर प्रेमलवार , गुलाबराव येलगंधरवार,गोलु कोटेवार,राम कोटेवार यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आलेशाम इडपवार (समाज सेवक )विक्की कोटेवार याला न्याय देण्यासाठी वेळ आली तर मुंबई, दिल्ली सुद्धा जाण्याची तयारी