विक्की कोटेवार वर अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल केल्यावरून विदर्भ युवा पदमशाली समाज कडुन पत्रकार परिषद

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- पत्रकार यांना माहिती देतांना शाम इडपवार (समाज सेवक )नरेश पंपनवार (अध्यक्ष ) राम कोटेवार, सनी बासनवार यांनी आमचे समाज बंधु विक्की विलास कोटेवार याच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या गेले आहे..दुसरीकडे विक्की शाहु, सोनु आर्या यांचा पोलीस रेकॉर्ड तपासला का? यांच्यावर अपहरण, फसवणूक, जबरदस्तती करणे कट कारस्थान करणे, गुंडेगिरी हे सर्व प्रकरण पोलीस रेकॉर्ड वर तपासल्यास लक्षात येते तरी सुद्धा? एक प्रकारे पत्रकारिच्या आड आपले अवैध कामे करतात.त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडून सत्य बाहेर आणुन न्याय मिळून दयावा अशी मागणी उपस्थित पत्रकार यांना केली. या प्रकरणात ज्या व्यक्तीचे अपहरण झाले आहे ती व्यक्ती स्वतः पोलिस स्टेशन येथे हजर असून सुद्धा तक्रार द्यायला तयार नाही याचाच अर्थ त्याचे अपहरण वगैरे काही झालेले नाही. तरीही पैशाच्या आणि पत्रकार पदाचा दुरूयोग करून आणि पोलिस अधीकार्याशी संगनमत करून कट कारस्थान रचून आमच्या समाज बांधाव विरोधात खोट्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.जर कुठलाही व्यक्ती मिसिंग असल्यास पोलिस 24 तासा पूर्वी त्याबद्दल तक्रार नोंद करत नाही परंतु या प्रकरणात फिर्यादी विक्की शाहु स्वतः सांगतो आहे की, दिनांक 19/12/2023 रोजी रात्री 8.30 चे सुमारास विक्की शाहु दिनेश आर्या ला भेटून सोनू आर्या बद्दल विचारते? दिनेश आर्या सांगते , त्याला कुणाचा तरी फोन आला व तो बुलेट गाडी घेवून गेला आहे त्याच तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास सोनू आर्याचा मोठा भाऊ दिनेश आर्या सोनू आर्या ला फोन करून विचारते तू कोठे आहे ? सोनू आर्या सांगते मी मित्रा सोबत आहो, थोडया वेळात घरी येतो . याचा अर्थ सोनू आर्या हा त्या रात्री आपल्या मित्रांसोबत होता आणि रात्री 12.30 च्या सुमारास घरी परत आला. जर सोनू आर्या हा आपल्या मित्रा सोबत आहे तर त्याचे अपहरण कशे काय झाले ?विक्की शाहु सांगते हनुमान मंदिर मास्टर कॉलनी जवळून सोनु आर्याचे अपहरण केले. दुसरीकडे सोनु आर्या स्वतः माझे अपहरण हनुमान मंदिर गौतम वार्ड येथून केले दोन्ही ठिकाणी बुलेट गाडी बाजूला चष्मा आहे असे दोघेही सांगत आहे.हे सर्व पोलीस बयानात आहे असे असताना ही पोलीस अधिकारी गुन्हे दाखल करते याचा अर्थ हे सर्व मिळून विक्की कोटेवार विरोधात मिळून कट कारस्थान रचले आहे. दी. 19/12/2023 रोजी दुपारी 2 च्या सुमारास रहेमत खान हा विक्की शाहुला फोन करून सांगतो की गिरड जवळ शेत दाखवायचे आहे. (याचा अर्थ विक्की शाहु सोबत रहेमत खान यांचे अगोदर पासुन व्यावसायिक व मित्रत्वाचे चांगले सबंध आहे)या वरून लक्षात येते की अपहरणाचे गुन्हे कोणत्या आधारे हिंगणघाट पोलीस अधिकारी यांनी दाखल केले याचे आकलन होत नाही. या वरून आपल्या लक्षात येईल की आमच्या समाज बांधवा विरोधात योजना तयार करून अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व लक्षात न घेता पोलीस अधिकारी यांनी खोटे गुन्हे दाखल करून पदाचा दुरुउपयोग केला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपअधिक्षक डॉ. सागर केवडे, व पत्रकार यांना केली यावेळी समाजातील बांधव उपस्थित होते

CLICK TO SHARE