हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल समिती द्वारे ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांची जयंती साजरी

खेल

प्रतिनिधी:आसीफ मलनस हिंगणघाट

हिंगणघाट:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीडा संकुल समिती हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 जानेवारी 2024 ला ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांची जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री कोडापे साहेब पंचायत समिती हिंगणघाट व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट या शाळेचे मुख्याध्यापक राजीव महाजन यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम मॅडम व क्रीडा अधिकारी अनिल निमगडे सर यांचा मार्गदर्शना खाली खेण्यात आला माननीय कोडापे साहेब व मुख्याध्यापक राजीव महाजन यांनी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळामध्ये मेहनत घ्यावी त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहते व खेळ भावना निर्माण होते असे विचार त्यांनी मांडले तसेच हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे यांनी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी. एल. खांडरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बखश व अजय बारसागडे दामिनी राऊत किड्स ब्राईट फ्युचर क्लब चे सर्व खेळाडू यांनी परिश्रम घेतले .. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये फुटबॉल सामन्यामध्ये पहिले बक्षीस किड्स ब्राईट फ्लूचर क्लब यांनी पटकावले तर खो-खो सामन्यांमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय यांनी पहिले बक्षीस प्राप्त केले दुसरे बक्षीस खो खो मध्ये संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट यांनी पटकावले तर कबड्डी स्पर्धेमध्ये ब्राईट फ्युचर क्लब यांनी पहिले बक्षीस प्राप्त केले. 3 किलोमीटर धावणे मध्ये मुलांमधून कृष्णा खापर्डे प्रणय भोंडे ओम चंदनखेडे तर मुलींमधून 3 किलोमीटर धावणे मध्ये अनुष्का ओके आरुषी गायकवाड साक्षी बावणे यांनी पटकावले आणि 100 मीटर धावणे मध्ये मुलामध्ये कृष्णा खापरडे, प्रणव भोंडे, ओम चंदनखेडे तर मुलीमध्ये 100 मीटर धावणे मध्ये कृष्णाई गवरकर दामिनी बावणे, मयुरी नेवारे यांनी पटकवले पाहुण्यांचे आभार तालुका क्रीडा संयोजक बी एल यांनी मांडले.

CLICK TO SHARE