जामगांव बू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे,घर चलो अभियान सुरू बीना परवानगीने दिली शाळेला दुपारी सुट्टी

एज्युकेशन

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव (बु.)

नरखेड तालुक्यातील जामगांव बू येथील जिल्हा प्राथमिक शाळेत काल पंचायत समिती कडून कोणतीही परवानगी न घेता शाळेतील मुख्यध्यापिका वंदनाताई धोटे यांनी आपल्या अधिकाराचा गैर वापर करत दुपारी 2.00 वाजता मुलांना सुट्टी दिली,सध्या जामगांव बु या शाळेत 7 वर्ग असून दोन शिक्षिका व एक शिक्षक कार्यरत आहे, तिन्ही शिक्षक बाहेरगावी राहतात, दररोज येणे जाणे करतात.गावातील माजी उपसरपंच संजय भलावी यांच्याकडे त्यांच्या साईची मुलगी दत्तक घेतली ती लहान पणापासून त्यांच्याकडे राहते या शाळेत दुसरीत शिकत आहे, त्यांनी मुलांना का शिकवत नाही असा जाब विचारल्यास त्यावर त्यांना शाळा समिती मंधून काढून टाकले,या बाबत सदर तक्रार मा, गट विकास अधिकारी पंचायत समिती नरखेड श्री,वानखेडे साहेब यांच्या कडे केली होती तक्रार मध्ये असे नमूद आहे की,शिक्षक मुलांना शिकवत नाही,शाळेत वेळेवर हजर राहत नाही,मुलांना शालेय पोषण आहार कमी देण्यात येते परंतु त्यांनी यावर कोणतीही कार्यवाई केली नाही, शिक्षण विभागाचे अधिकरी बी ओ साहेब जनबंधू यांना विचारले शाळेला सुट्टी का आहे, त्यांना याची काहीच माहिती नाही ,यावरून असे लक्षात येते की,यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांचे वचक राहिला नाही,समोर अधिकारी काय कारवाई करणार यावर संजय भलावी यांचे लक्ष्य वेधले आहे.

CLICK TO SHARE