मनपा शालेय क्रीडासत्राचा उदघाटन सोहळा संपन्न १७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

खेल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर १७ जानेवारी – चंद्रपूर महानगरपालिका संचालित २७ शाळांचे शालेय क्रीडासत्राचे उदघाटन १६ जानेवारी रोजी कोहिनुर क्रीडांगण येथे उपायुक्त मंगेश खवले व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी उपायुक्त यांनी मनपाच्या शाळांची पटसंख्या वाढल्याचे तसेच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व कौशल्यरित्या सादर केलेल्या शो ड्रिलचे कौतुक केले. क्रीडासत्रात मनपाच्या २७ शाळांचे १७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ३ दिवसीय क्रीडासत्रात खो-खो, कबड्डी, गोळा फेक, रीले रेस, लांब उडी, वैयक्तीक कौशल्य इत्यादी विविध मैदानी खेळ खेळले जाणार आहेत. ३ दिवस विद्यार्थ्यांच्या भोजनाची तसेच मध्यान्हात दुध देण्याची व्यवस्था मनपातर्फे येणार आहे.रैयतवारी कॉलरी मराठी प्राथ. शाळा, भा. डॉ. भीमराव आंबेडकर शाळा, पंडित जवाहरलाल नेहरू प्राथ. शाळा यांच्यातर्फे शो ड्रील तर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच लेझीम, बलुन ड्रील, समुह गान प्रस्तुत करण्यात आले. यावेळी शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना खेळभावनेची तर आयुक्तांद्वारे पंचांना निष्पक्षतेची शपथ देण्यात आली. संचालन स्वाती बेत्तावार, उमा कुकडपवार यांनी तर सुनील आत्राम यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी शहर अभियंता अनिल घुमडे, प्रशासन अधिकारी नागेश नीत, जिल्हा समन्वयक रवी तामगाडगे, क्रीडा प्रमुख कार्यवाह उमेश आत्राम, वामन कुमरे, सय्यद शहजाद, अरुण वलके, मधुकर मडावी, शरद शेंडे, रवींद्र गोरे, राजकुमार केसकर अमोल कोटनाके प्रशांत आकनरवार शिवलालइरपाते, भुषण बुरटे, संदीप जवादवार, सुचिता मालोदे, संजना पिंपळशेंडे, परिणय वासेकर, बबिता उईके, विद्यालक्ष्मी कुंडले, रामकुमार हिवारे उपस्थीत होते.

CLICK TO SHARE