वंबआचे युवा अध्यक्ष सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्य रूग्णांना फळ वाटप

अन्य सोशल

तालुका प्रतिनिधी:नंदूप्रसाद शर्मा देवरी

देवरीदेवरी येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन.देवरी,ता.१७: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवस काल मंगळवार (ता.१६ जानेवारी) रोजी देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भर्ती रूग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करूण मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्य देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भर्ती ५० च्या जवळपास रूग्णांना केळा, संत्री,सेफ व बिस्कीट चे वाटप केले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.मेघा फटिंग आणि वंचित बहुजन आघाडी देवरी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ता सी.बी.कोटांगले,मधुकर साखरे,किशोर,राऊत, पृथ्वी राज नंदेश्वर , मनोज साखरे, माणिक राऊत, प्रशिक जनबंधू , इलीयाज कुरेशी, सचिन जनबंधू ,जय साखरे, जयंत टेभूर्कर, नेत्राम कराडे, शैलेश पांडे, विक्की बोरकर, जयेश साखरे, सिद्धार्थ रामटेके, संदीप साखरे, शैलेश शहारे व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE