प्रतिनिधि:ईमरान मिर्ज़ा अकोला
अकोला:अपात्र लाभार्थ्यांना दिलेले गैरकायदेशिर सेतू केंद्र बंद करण्यात यावे व सेतू केंद्रामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की आपल्या कार्यालयातून वाटप झालेले आधार संच व सेतू केंद्रामध्ये भ्रष्टाचार करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाई कर्यात यावी, तसेच अपात्र लाभार्थना दिलेले गैरकायदेशिर सेतू केंद्र बंद करण्यात यावे आणि गरजू लाभार्थ्यांना आधार संच व सेतू केंद्र देण्यात यावे. ज्या ऑपरेटरने विऋष कॉरपोरेशमध्ये आधार कार्डचे काम केले आहे. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा, या मागण्यांसाठी सदर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष मिर्जा इमरान बेग, गणेश मानकर, केशव मुळे व तौफिक शेख, सैय्यद शहज़ाद,फरहान मिर्ज़ा,कादरी चाचा,जहांगीर खान,वकार अली,अब्दुल,निसार, मंगेश पलस्पगार,अब्दुल अंसार,योगेश गावंडे,रशीद खान लोधी,ज़मीर शेख, व आदि यांचा समावेश आहे.