रेती तस्करांविरोधात तहसीलदार मैदानात

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

राजस्व विभागातर्फे संपूर्ण राज्यामध्ये अवैध रेती उत्खननाला बंदी असताना कोरपना तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार रणजित यादव यांनी अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. यादव यांनी त्यांच्या अधिनस्त महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना कार्यवाहीसाठी कडक आदेश दिल्याचे समजते. यानंतर अंतरगावचे पटवारी मासीरकर व मंडळ अधिकारी उईके यांनी अवैद्य रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर कोरपना परिसरात पकडले.

CLICK TO SHARE