स्थलांतरित झालेले विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

कोरपना तालुक्यातील लालगुडा गावाजवळ कामाला आलेल्या मिरची तोड स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षकाच्या प्रयत्नामुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त परिसर’ ही मोहिम अधिक व्यापक व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा ता. कोरपना जि. चंद्रपूर येथील शिक्षक गोविंद पेदेवाड मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी विविध प्रयोग करत असतात.

CLICK TO SHARE