सारंगस्वामी यात्रेत150 ते 200 क्विंटल भाजीप्रसादाचे वाटप,एक लाख भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादचा लाभ

धर्म

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

औठा : येथून जवळ असलेल्या सारंगवाडी येथील डोंगर रानावर सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराज यात्रेत 17 जानेवारी रोजी बुधवारी भाजी महाप्रसादाचा एक लाखच्या वर भाविकांनी लाभ घेतला. यावेळी जवळपास दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यात आले होता. राज्यभरासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वीरशैव समाज बांधव भाजीचा प्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते.शिरडशहापूर येथून जवळ असलेल्या सारंगवाडी येथे डोंगरावर वीरशैव समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या सारंग स्वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे तसेच सारंग स्वामी महाराज यांनी घेतलेली संजीवनी समाधी व येथील उंच टेकडीवर त्यांचे समाधी मंदिर आहे. मकर संक्रांतीच्या कराच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रेला 529 वर्षाची परंपरा आहे .या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे आणि ही भाजी सर्व दूर प्रसिद्ध आहे. ही भाजी खाल्ल्याने वर्षभर रोगराई होत नाही अशी आख्यायिका आहे. हा भाजीच्या प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर येथे भाविक येत असतात तसेच भाविक ही भाजी खाण्यासाठी सोबत पोळ्या सुद्धा घेऊन येत असतात .पोळ्या सोबत भाजी खाल्याची मजाच वेगळी असते.यावर्षी जवळपास दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता .यामध्ये यात्रा कमिटी तसेच भाविकांनी भाजीपाला यामध्ये वांगे, बटाटे, चवळी ,टमाटे, गाजर, दोडके, पालक ,चुका, शेपू, मेथी ,हरभरा, करडी, पान कोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची ,काकडी, मुळा, , भोपळा, कांद्याची पात, ऊस आधी भाज्या आणून दिल्या या सर्व भाज्या एका लोखंडी कढईत मिसळून त्यात गोड तेल मसाला टाकून फोडणी देऊन भाजी चाप्रसाद तयार करण्यात आला व या भाजीच्या प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. हजारो भाविकांनी रांगा लावून “सारंगा सारंगा दूर करी भवरोगा “असे म्हणत भाजीचा लाभ घेतला .तसेच उज्वलाताई ताभाळे यांच्याकडून भाविकांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले.दुचाकी वरून तोबा गर्दी ——————————-यात्रेसाठी चार चाकी, दुचाकी ,तीन चाकी वाहने तसेच पायी देखील भाविक येथे आले होते . वसमत आगाराकडून बसची ————————————व्यवस्था———— यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बस ची व्यवस्था केली होती,यात्रे साठी 10 ज्यादा बसेस सोडण्यात आले होत्या, वसमत होऊन थेट सारंगवाडी यात्रा व सारंगवाडी यात्रेतून औंढा ,वसमत कडे बस सोडण्यात आले होते . यात्रेत चोख पोलीस बंदोबस्त —————————————यात्रेसाठी 1 डी. वाय .एस. पी .6 पोलीस अधिकारी ,50 पोलीस अंमलदार,10 महिला पोलीस, 10 महिला होमगार्ड ,1 आर.सी.बी . प्लॅटूंची तुकडी आदिनी चौक बंदोबस्त ठेवला होता .@⁨+91 93706 12146⁩ दिंड्या पायी दाखल—_———-@——–शिवयोगी सारंग स्वामी महाराज की जय हो,, हर हर महादेव ,,संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज यांच्या जयघोष करीत दिंड्या सारंग स्वामी यात्रे त दाखल झाल्या होत्या.विविध वस्तू विक्रीच्या दुकानासह धार्मिक पुस्तके धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आली होती. यात्रेमध्ये कीर्तन ,भजन व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. भाविकांची मोठी वर्दळ व वाहनांनी हा परिसर गजबजुन गेला होता. भाजीच्या प्रसादासाठी सारंग स्वामी यात्रा कमेटी, विश्वस्त कमेटी, वीरशैव समाज बांधव शिरड शहापूर ,सारंगवाडी गवलेवाडी ,गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

CLICK TO SHARE