पाच दिवसांपासून चालतोय अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

शहरातील मुख्य चौक, रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध ब्रहापुरी नगरपरिषदेने १३ जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सलग पाचव्या दिवशी नगरपरिषदेची ही मोहीम सुरूच आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत, तर शहरातील मुख्य चौकांनी व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मागील आठवड्यात अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता. त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

CLICK TO SHARE