रियाजोद्दीन कुरेशी यांच्या प्रयत्नाने वसमतला जि.प.मैदानात नईमोद्दीन कुरेशी लिग सामन्याचे आ.सुरेश राव वरपुडकर यांच्या हस्ते उद्घाटन

खेल

प्रतिनिधी :अशोक इंगोले (हिंगोली)

नईमोद्दीन कुरेशी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने वसमत येथील जिल्हा परिषद च्या भव्य मैदानावर नईमोद्दीन कुरेशी क्रिकेट लीग सीजन टू चे उद्घाटन गुरुवारी पाथरीचे आमदार व परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश राव वरपूडकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुनीर पटेल हे होते. वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते नईमोद्दीन कुरेशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे बंधू वसमत चे माजी उपनगराध्यक्ष म रियाजोद्दीन कुरेशी व शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार यांच्या नेतृत्वाखाली नईमूद्दीन कुरेशी क्रिकेट लीग अंतर्गत वसमत येथे क्रिकेटचे भव्य सामने आयोजित करण्यात येत असतात या सामन्याचे हे दुसरे वर्ष आहे. आज वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावर या क्रिकेट लीगचे उद्घाटन आ सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मा मुनीर पटेल, माझी नगराध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ. हाफिज रहमान डॉक्टर असोसिएशनचे डॉ एम आर क्यातमवार, शेख रियाज कुरुंदकर, डी. वाय. एस. पी. संदीपान शेळके पा. नि .कदम साहेब, ग्रामीणचे सोपोनी अनिल काचमाडे, काँग्रेसचे नेते शे अलीमुद्दीन व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सिद्दिकी आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

CLICK TO SHARE