सरपणासाठी गेलेल्या वृद्धेचा रेल्वेने मृत्यू

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

विसापूर येथील एका वृद्ध महिलेचा रेल्शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूरवेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही जुना पॉवरहाऊस परिसराजवळ गोंदिया मार्गावर घडली. सरस्वती भाऊराव पायघन (७८) असे मृत महिलेचे नाव आहे. सरस्वती पायघन या सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, रेल्वेमार्ग ओलांडताना बल्लारपूरकडून येणाऱ्या रेल्वेने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तपास विसापूर पोलिस चौकीचे अधिकारी जीवन पाल व बल्लारपूर रेल्वे पोलिस सहायक उपनिरीक्षक पी. आय. लाडस्कर करीत आहेत.

CLICK TO SHARE