सायबर गुन्हे व फसवणुक या विषयावर आय.आर.बी. ग्रुप पंधरा कँप बिरसी येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

अन्य

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

या विषयी थोडक्यांत माहिती अशी की, सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे दिसून येते…गोंदिया जिल्हयात सुध्दा बऱ्याच लोकांची ऑनलाईन फसवणुक होत असल्याने नागरीकांमध्ये विशेषतः पोलीस अधिकारी-अंमलदार यांना याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनात आय.आर.बी ग्रुप 15 कॅप बिरसी येथे अधिकारी-अंमलदार यांची भविष्यात फसवणुक होऊ नये म्हणुन सायबर गुन्हे व होणारी फसवणूक या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते… आयोजीत करण्यात आलेल्या *कार्यशाळेत प्रामुख्याने..* *१) के.वाय.सी. फ्रॉड* *२) स्क्रीन शेअर फ्रॉड* *३) केबीसी फ्रॉड* *४) लोन फ्रॉड* *५) गुगल कस्टमर केअर फ्रॉड* *६) फेसबुक प्रोफाईल फ्रॉड* *७)ओ.एल. एक्स फ्रॉड* *८) अमेझॉन फ्रॉड* *९) व्हॉटसअप व्हिडीओ कॉल* *१०) मॅट्रीमोनिअल फ्रॉड* यामध्ये फसवणुक करणारे लोक वेगवेगळया प्रकारची आमिषे देवुन नागरीकांची दिशाभुल करून कशाप्रकारे फसवणूक करतात व आपण काय सावधानता बाळगायला पाहीजे याविषयी विविध दाखले देवून पोलीस हवालदार संजय मारवाडे व पो.शि. रोशन येरणे, योगेश रहीले, सायबर सेल गोंदिया यांनी कार्यशाळेत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत भा.रा.बल 2, रा.रा.पो.बल गट क्र. 15, बिरसी कॅंप, गोंदिया येथील पोउपनि सचिन चरडे, पोउपनि नरेंद्र परीहार तसेच अंमलदार उपस्थित होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन तसेच आभार पोउपनि नरेंद्र परीहार यांनी मानलेत.

CLICK TO SHARE