शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
भद्रावती लगतच्या बरांज येथील एम्टा कोळसाखान परिसरात एका कामगाराने सीट बेल्टच्या सहाय्याने एका ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संजय मोचीराम (२६) असे मृतकाचे नाव आहे. मृतक ओरिसा राज्यातील रहिवासी आहे. घटनेची माहिती प्राप्त झाल्यावर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.