राम मंदिराच्या उद्घाटनाला आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार

धर्म

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला बौद्ध धर्मगुरु दलाई लामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही उपस्थित राहणार आहेत. मंदिर ट्रस्टने देशातील अनेक नामवंत व्यक्तींना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. या कार्यक्रमाला 8,000 हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्यामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती असतील.

CLICK TO SHARE