राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय जामगांव फाटा येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमास सुरुवात

एज्युकेशन

प्रतिनीधी:विजय बागडे जामगाव (बु.)

नरखेड:नरखेड तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय जामगांव फाटा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमास सुरुवात झाली हा कार्यक्रम दिनांक 23/01/2024 ते दिनांक 26/01/2024 पर्यंत होणार असून काल शाळेचे मुख्याध्यापक श्री दोडके सर यांनी विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात केली,काल कार्यक्रमामध्ये गीत गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,शुद्ध लेखन स्पर्धा,निबंध स्पर्धा, तसेच चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांमंध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते, अश्या कार्यक्रमामुळे विद्यार्थांचे मनोबल व आत्मविश्वास वाढावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते,शाळेतील,शिक्षक वृंद श्री,बोंडे सर, दाऊतपुरे सर, वंजारी सर, लव्हाळे मॅडम, उईके मॅडम,धोटे मॅडम तसेच शिपाई वर्ग या सर्वांचा सहभाग व परिश्रमाने कार्यक्रमाची रूपरेषा नुसार कार्यक्रम पार पाडण्यात येते व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास सहभाग घेतात.

CLICK TO SHARE