स्व.श्वेताताई डोंगरे स्व सुनीताताई लोही यांच्या स्म्रुतिप्रीत्यर्थ रात्रकालिन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खेल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:शितला माता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पेठबुधवार काटोल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पेठबुधवार येथे पाच दिवसीय रात्रकालिन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी ग्रुहमंत्री आमदार अनिल देशमुख माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख मंडळाचे अध्यक्ष न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष जयस्वाल प्रा रमेश येवले पोलीस कर्मचारी किशोर निखाडे प्रमोद वरभे. न प अभियंता नितिन गौरखेडे राजेंद्र काळे अरुण मानकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून चाळीस च्या वर संघ सहभागी झाले त्यात फायनल च्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस युवा शक्ती क्रिकेट संघ काटोल च्या संघांनी. 31000रु पटकावला तर दुसरे बक्षीस शितला माता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पेठबुधवार यांनी 21000रु तर तिसरे बक्षीस. 11000रु तिनखेडा च्या संघांनी मिळविले तर विविध बक्षिसे खेळाडूंनी पटकावले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दिगांबर डोंगरे. सुरेंद्र लोही शब्बीर शैख उपाध्यक्ष मोहनीश मने सचिव रोशन पांडे रेवन कावळे रुपेश गाढवे चेतन तुरनकर अक्षय गाढवे भारत सुरजुसे भुषण डफरे शंकर चंदनकर शुभम रंगारी मुकुल मनने. अंकुश गायकवाड लखन पलेरिया लकी वानखेडे मयूर तुरनकर आदित्य कावळे मुकुल नारनवरे यांनी अथक प्रयत्न केले

CLICK TO SHARE