75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा

देश

10 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला दिला ध्वजारोहन करण्याचा मान,मृणाल मानमोडे यांच्या हस्ते केले ध्वजारोहन.

प्रतिनीधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त. 27) एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूल व सरस्वती विद्या मंदिर जलालखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे दरवर्षी एस आर के इंडो पब्लिक स्कूलच्या वतीने वर्ग 10 वी मध्ये पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला ध्वजारोहन करण्याचा मान दिला जातो. यावेळी हा मान वर्ग 10 वी मधून तालुक्यातून 95.40 टक्के गुण घेत प्रथम आलेला मृणाल मानमोडे याच्या हस्ते ध्वारोहण करून त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी त्याचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतून द्वितीय आलेली हर्षणी डांगर, तृतीय आलेला सर्वेश नंदनवार तसेच रुपाली कन्हेरे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तसेच आपल्या भाषणातून देशाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी संस्थेचे संचालक कुलदीप हिवरकर, श्रावण माकोडे, माजी उपसरपंच महेंद्र कुवारे प्रमोद पेठे, मोतीराम बारापात्रे, बाळाजी खोपे, डॉ अर्चना कळंबे, ग्राम पंचायत सदस्य रुपाली खडसे, कीर्ती पेठे, दिलीप मानमोडे, दीपक गायवाड, कल्पना आखरे, वैशाली नंदनवार, मुख्याध्यापिका अनिता हिवरकर, प्राचार्या शुभांगी अर्डक, कैलास चौरे, एकनाथ नाईक, निलेश कोढे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन चैताली अंतूरकर, गुंजन ठाकरे, ज्ञानेश्वर सोनोने, पूजा राऊत यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.फोटो ओळी. वर्ग 10 मध्ये तालुक्यातून प्रथम आलेला मृणाल मानमोडे ध्वजारोहन करताना.

CLICK TO SHARE