जिल्हा प्राथमिक शाळा चिखली मैना येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा,A.V. फाऊंडेशन या सामाजिक संस्था मार्फत बक्षीस वितरण.

एज्युकेशन

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव (बु.)

काटोल:तालुक्यातील चिखली मैना या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला,ध्वजारोहण मा,सौ, कुमुदताई दीलीपजी काळे,ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा, श्री.सतीशजी काळे साहेब,ग्राम पंचायत सदस्य,सौ,अंजलिताई दुपारे श्री,अशोकजी गोंडाणे,शाळा समिती व्यवस्थापक,मा, श्री, भुजंग जी गोंडाने पोलिस पाटील,मा,श्री,चींधुजी पाटील ज्येष्ठ नागरिक,मा,सौ,शिलाबाई शेंडे सी. आर.पी,महिला बचत गट मा.श्री,दिनेशजी च.दुपारे,मा,श्री,बाबारावजी डफरे ग्राम पंचायत कर्मचारी,मा,श्री,योगराज जी दूपारे,अंगणवाडी सेविका सौ,लीलाबाई दुपारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक युवती मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापिका मा,सौ,प्रांजली ढोक मॅडम यांनी केले,तत्पूर्वी भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती, शाळेतील विद्यार्थांना नुत्य व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थांना A. V. फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष श्री,विकास सोमकुंवर यांच्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात आले, व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला

CLICK TO SHARE