स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणाना व्हावं देणे,स्नेहसंमेलन म्हणजे पर्वणीच,शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती

एज्युकेशन

प्रतिनिधी:विजय बागडे भारसिंगी

जलालखेडा (त.26) आर. एम. इंगोले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भारसिंगी येथे 53 वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यात विशेष उप्रकम राबवण्यात आले. माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांना बोलावण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात गणेश वंदना, भारतीय संस्कृती, लोककला, शेतकरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांची अभिनय क्षमता पाहून पालकांनी देखील टाळ्या वाजाऊन दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांना ग्रामगीता भेट देऊन ग्राम वसा जोपासण्याचे काम विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन इंगोले यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण जोध कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प. नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवीण जोध यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासोबत इतर व्यवसायाचे महत्त्व सांगत असताना शहरी आणि ग्रामीण भागाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामगीता भेट देऊन ग्रामवसा जोपासल्याबद्दल मुख्याध्यापक व संस्थेचे आभार मानले. ठाणेदार चेतनसिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, शाळा व विद्यार्थी जीवन याचे महत्त्व पटवून दिले. तसेच आजच्या आंतरजालीय युगात सुद्धा विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी कसे नाते जोपासावे याबद्दलची माहिती दिली. अनिल गोतमारे यांनी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी व मराठी शाळेतील विद्यार्थी कसे असतात या बाबत बोलताना ते म्हणाले की इंग्रजी शाळेतील विद्यार्थी हे परीक्षार्थी असतात. तर मराठी शाळेतील मुल विद्यार्थी असतात. त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुणांना कशी चालना मिळते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच मराठी शाळेचा ध्यास असतो याबद्दलची माहिती दिली. शिवशंकर खेडेकर पोलीस निरीक्षक नागपूर यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कशा असतात व त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाचे सातत्य कसे असावे याची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कशाप्रकारे यश प्राप्त करू शकतो याची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांची मन जिंकली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश इंगोले तसेच सचिव चंद्रशेखर इंगोले व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी साक्षी रोकडे व कुमारी गौरी इंगोले हिने केले. तसेच आभार प्रदर्शन धुरा साक्षी रोकडे या हीने केले. तसेच विशेष उपक्रम अंतर्गत माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा मेळावा यावेळी घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.फोटो ओळी. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना मान्यवर.बॉक्स, स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कलागुण सादर करण्यासाठी पर्वणीच असते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. सुधाकर अडबाले शिक्षक आमदार.

CLICK TO SHARE