श्री क्षेत्र गोरक्षणाथ महाराज वाई यात्रेत भव्य शंकर पट

सोशल

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत तालुक्यातील वाई येथे श्री क्षेत्र गोरक्षनाथ वाई देवस्थान ची यात्रा भरली आहे या यात्रेनिमित्त दोन दिवशीय भव्य शंकर पटाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाडा स्पर्धेमध्ये नामांकित बैल जोड्यांनी हिंगोली, परभणी, नांदेड, वाशीन, आकोला, लातुर, बिक, जालना सह मराठवाड्यातून तब्लल 150 हून आधिक बैल जोडयांनी सहभाग घेतला होता . या भागावधल्या कास्तगार , शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा सोहळा हा गेल्हा शेकडो वर्षापासून आयोजीत केला जातो. शंकर पट घेण्याचा एकच उदेश आहे ते म्हणजे या महाराष्ट्रात देशी गव्हान्स कमी होत चालले आहे ते वाढाव शेतकरी राजा वर्षभर शेतात राब राब राबतो त्याचा उत्साह वाढावा आनंद मिळावा सोबतच परीसरातील छोटे छोटे उद्योग धंदयाचीही आर्थिक उला ढाल व्हावी हाच एकमेव उदेश असतो. हि स्पर्धा दोन दिवसीय असुन या स्पर्धेत सर्वात कमी वेळेत म्हणजे 5 शेकंद 18 पॉईन्ट धावणारा भागवत कदम यांचा पिंपराळ्याचा बॉस व दाभजीचा लक्षा प्रथम क्रमांकावर येताच शेतकरी प्रेक्षकात आनंदाच वातावरण निर्माण झाले. श्री क्षेत्र वाई गोरक्षणाथ वाई देवस्थान कमेटीच्या वतीने प्रथम दुतीय व तृतीय व चतुर्थ पारितोशिके सत्यनारायन बोखारे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती

CLICK TO SHARE