आदिवासी पारधी विकास परिषद नागपूर यांच्या वतीने जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन

अन्य

काटोल तालुक्यातील म्हसखापरा येथे शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:(ता. 30) काटोल तालुक्यातील म्हसखापरा येथील आदिवासी पारधी समाजातील नागरिकांचे जात प्रमाण पत्र,राशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरण्यासाठी, बी.पी.एल. चे दाखले मिळण्याकरिता आदिवासी पारधी विकास परिषद, नागपूर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन सोमवारी म्हसखापरा येथे करण्यात आले होते. आदिवासी पारधी समाजातील नागरिकांचे जात प्रमाण पत्र, राशन कार्ड इत्यादी मिळावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काटोल व नरखेड तालुक्यातील ज्या गावांमध्ये आदिवासी पारधी समाज आहे त्या प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन करण्यात यावे यासाठी आदिवासी पारधी विकास परिषद, नागपूर यांच्या वतीने तहसीलदार याना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील आदिवासी पारधी समाज असणाऱ्या प्रतेक गावामध्ये शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार वेग वेगळ्या दिवशी या शिबिराचेआयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये आदिवासी पारधी समाजातील नागरिकांची जात प्रमाण पत्र,राशन कार्ड,बी.पी. एल चे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्मसाठी कागद पत्रे तयार करण्यात आली. मोठ्या प्रमाणात आदिवासी पारधी समाजातील नागरिकांनी या शिबिरात उपस्थितीत राहून आपले काम करून घेतली.आदिवासी पारधी विकास परिषद नागपूर व रुपेश पवार यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संयोजन आदिवासी पारधी विकास परिषद नागपूर रुपेश भाऊसाहेब पवार, सयोजक आशीष कावळे, प्रान्त सयोजक देशराज पवार, सामाजिक कार्यकर्ता सूरमाजी राजपूत, सामाजिक कार्यकर्ता विजय राजपूत, उपाध्यक्ष जयंता कळंबे, अध्यक्ष आदिवासी आघाडी नागपूर ग्रामीणहरीश कंगाली, महामंत्री आदिवासी आघाड़ी नागपुर ग्रामीण प्रशांत मडावी,विजय राजपूत उपस्थिती होते.आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र वितरित करताना मान्यवर.

CLICK TO SHARE