शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

परितक्ता आणि निराधार महिलांसाठी आपण आयोजित केलेला सौभाग्य सोहळा हा अभिनव उपक्रम असून यातून अशा महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे. आपणही कर्तव्य सेतू केंद्र सुरु केले असून या केंद्राच्या माध्यमातून निराधार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. संकल्प संस्थेच्या वतीने मकर संक्रांती निमित्त मुल रोड येथील कार्यालयात श्रीमतींचा सौभाग्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते.

CLICK TO SHARE