बल्लारपूर शहरातील तीन दिवस पाणीपुरवठा बंद

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरावठा योजनेंतर्गत सुमारे १५ हजार नळधारकांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. नदी जवळ असलेला संपवेल मध्ये गाळ साचल्याने ते स्वच्छ करणे आवश्यक आहे. परिणामी नळधारकांना पूर्वीप्रमाणे शुद्ध पाणी मिळू शकेल.यासाठी १ ते ३ फेब्रुवारी या तीन दिवसाच्या कालावधीत वर्धा नदीवर असलेल्या विहिरीची स्वच्छता करण्यात येणार आहे, त्यामुळे बल्लारपूर शहरातील सुमारे १५ हजार नळधारकांचा तीन दिवस पाणी पुरावठा बंद राहणार आहे.

CLICK TO SHARE