महाराष्ट्र एसटी कामगार संघटना हिंगणघाट आगाराची कार्यकारिणी जाहीर

अन्य

प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

दि.३१ जानेवारी २०२४ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या सन २०२४च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन संकट मोचन हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते वार्षिक सर्वसाधारण सभा विभागाचे विभागीय अध्यक्ष सचिन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून विभागाचे विभागीय सचिव शम्मी पठाण होते. सभेला संबोधित करताना सर्व प्रथम विभागीय सचिव यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेल्या विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. हिंगणघाट आगाराचे अध्यक्ष म्हणून प्रदीप शेंडे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. आगाराचे सचिव म्हणून श्रीकांत काशीद यांची सुद्धा एकमताने कुठलाही विरोध न करता फेरनिवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हूणन अल्ताफ मिर्झा तसेच कोषध्यक्ष म्हणून राजेंद्र मडावी, उपाध्यक्ष म्हणून अनिल करपते. संघटन सचिव म्हणून विलास फुसाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे असंख्य सभासद उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

CLICK TO SHARE