लोकसभा निवडणूक 2024 : भाजपचे ‘ओबीसी कार्ड,संजय धोटेंपर्यंत येऊन पोहोचला

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बाळु धानोरकर मोदी लाटेत काँग्रेसचे उमेदवार दिवगंत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले होते.संजय धोटे सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर प्रमोद काकडेलोकसभा निवडणूक 2024 : मोदी लाटेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढविली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील सामाजिक समीकरणात बसणारा आणि सर्वसमावेशक उमेदवारांच्या नावावर पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. यात राजुऱ्याचे माजी आमदार संजय धोटे यांचेही नाव चर्चेत आहे.लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात पक्षाकडून विचारणा झाली आहे, याला धोटे यांनीही पुष्टी दिली. त्यामुळे भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता चांगली स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे उमेदवार दिवगंत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले होते. ते राज्यातील कॅांग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या विजयात अनेक घटकांचा समावेश आहे.संजय धोटे .सुधीरभाऊ मुनगंटिवार .हंसराजभैया अहिर.2023 सुधीर मुनगंटीवार .बीजेपीओबीसी समाजाचे एकत्रिकरण त्यांच्या पथ्यावर पडले. त्यांच्या निधनानंतर राजकीय समीकरण बरीच बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. हंसराज अहीर यांनी यांसदर्भात अनेकदा नाराजी व्यक्त केली. आता लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून येथे ओबीसींची आंदोलन झाली.या मतदारसंघात ओबीसी आणि आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आहे. तत्पूर्वी लोकसभेतील धानोरकरांच्या विजयानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातसुद्धा ओबीसी कार्ड चालले. भाजपच्या दोन्ही हक्काच्या जागा काँग्रेसने हिसकावून घेतल्या. ओबीसी या मतदारसंघात जयपराजयाचे गणित ठरवू शकते, याची जाणीव भाजपला आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातसुद्धा ओबीसी चेहरा हवा, असा निष्कर्ष आल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चा आहे. मात्र दिल्लीत जाण्यासाठी ते फारसे इच्छुक नाही, असे समजते. अहीर यांचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद देवून पुर्नवसन केले. मात्र अहीर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तेसुद्धा ओबीसी आहेत. दुसरीकडे मुनगंटीवार यांनीही कार्यक्रमांचा सपाटा सुरु केला असून लोकसभेची सुत्र आपल्याच हाती असल्याचे चित्र निर्माण केले आहे.सामाजिक समीकरणात आणि सर्व गटांना चालणारा उमेदवारांचा शोध भाजपकडून सुरु आहे. हा शोध सध्यातरी माजी आमदार संजय धोटे यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. सन २०१९ विधानसभा निवडणुकीत धोटे यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात पक्षाकडून विचारणा झाली आहे, असे धोटे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जिवतोडे यांचेही नाव या यादीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपचे धक्कातंत्र बघता या व्यतिरिक्त आणखी एखादा नवा चेहरा लोकसभेच्या मैदानात दिसू शकतो.

CLICK TO SHARE