वसमत शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

वसमत :प्रभाकर दादा मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोसात साजरावसमत शिवसेना शहरप्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात शहरातील व ग्रामीण भागा मध्ये साजरा करण्यात आला . त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून .पळसगाव येथील वृध आश्रम येथे तेथील नागरिकांना गहू तांदूळ फळ वाटप करण्यात आले व तसेच गोशाळा येथे एक ट्रक चारा वाटप करण्यात आला . वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेली एलबीएस विद्यालय येथे केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .खांडेगाव पाटी येथील मूकबधिर अपंग विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना फळ वाटप अन्नदान वाटप करण्यात आले व तसेच अभय शेठ जैन यांच्या दुकानावर देखील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी सर्व मित्र परिवार व प्रभाकर दादा मित्र मंडळाच्या वतीने हे सर्व उपक्रम घेण्यात आले .प्रभाकर क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्या कडून ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व हार तुर्यानी त्यांचे जंगी स्वागत सत्कार करून त्यांना पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा देण्यात आल्या .

CLICK TO SHARE