आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट शहरातर्फे तीव्र निषेध

अन्य

प्रतिनिधी:करीम खान हिंगणघाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी निवेदन देत सरकारचा केला तिव्र निषेध …*हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून इंडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावली आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात आहे. यांचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी तहसीलदार यांना निवेदन देत निषेध नोंदवला…यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ज्येष्ठ नेते संतोषराव तिमांडे गुरुजी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, मारोती महाकाळकर, अमोल बोरकर, प्रविण श्रीवास्तव, राजूभाऊ मेसेकर, नदीम भाई, गोमाजी मोरे, उमेश नेवारे, सुनील भुते, जगदीश वांदिले, अनिल लांबट, शेखर जाधव, आशिष मंडलवार, सचिन धारकर, नंदू मोकाशी, नितीन भूते, रोहित बक्षी, प्रशांत ऐकोनकर, बच्चु कलोडे, सुशील घोडे, हर्षल स्यमुअल, रविकिरण कुटे, श्रीराम डहाने, प्रेमदासजी सूर्यवंशी राजू मुडे, अरुण सातरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE