आजपासून चंद्रपुरात क्रीडा महोत्सव

अन्य खेल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव २०२४ अंतर्गत भिवापूर प्रभाग जुनी वस्ती येथे शुक्रवार (दि. २) पासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात मागील वर्षीदेखील श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. भिवापूर येथे जय श्रीराम क्रीडा मंडळच्या सहकार्याने पुरुष व महिलांचे कबड्डी सामने खेळल्या जाणार आहे. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धेचा समारोप होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

CLICK TO SHARE