जिवती तालुक्यातील वनक्षेत्राचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावणारच

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : जिवती तालुक्यातीलवनक्षेत्रात समाविष्ठ १०५ महसुली गांचे ब ४८ हजार हेक्टर जमिनीच्या डिफॉरेसस्टेशन संबंधातील विषयावर गंभीरपणे कार्यवाही सुरू असून लोकभावनांशी निगडीत हा प्रश्न जिव्हाळ्याचा असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावू असा निर्धार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.जिवती, कोरपना या तालुक्यात सशक्त बूध अभियान अंतर्गत ०३ फेब्रुवारी रोजी हंसराज अहीर यांनी बुध व जनसंपर्क तसेच भाजपाच्या गांव चलो अभियानाच्या पार्श्वभूमिवर भेट दिली. त्याप्रसंगी जिवती तालुक्यातील नागरीकांशी संवाद साधतांना त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला. याविषयी अहिर यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात सुनावणी घेतली आहे हे विशेष.या जनसंपर्क मोहिमे अंतर्गत हंसराज अहीर यांनी जिवती तालुक्यातील चिखली (बु.) नाईकनगर, पाटण, शेणगांव टेकामांडवा व चिखली खुर्द या गांवांना भेटीदेवून बंध कार्यकर्त्यांशी संपर्क करीत स्थानिक नागरीकांसोबत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी बैठका घेवून नागरीकांच्या अडचणी समजून घेतल्या व निवेदने स्विकारली, अहीर यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा व नांदा या गांवानाही भेटी दिल्या,हंसराज अहीर यांच्या या जनसंपर्क दौ-यात भाजपा नेते खुशाल बोंडे, केशवराव गिरमाजी, सुरेश केंद्रे, महेश देवकते, गोविंद टोकरे, बालाजी भुते, माधव नवले, शिवाजी सेलोकर, निलेश ताजने, सरपंच अनु ताजने, रामसेवक मोरे, निलेश ताजने, उपस्थित होते.

CLICK TO SHARE