सोयाबीन खरेदी करीता ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : नाफेडतर्फे आधारभुतकिंमत खरेदी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या हंगामात सोयाबीन खरेदीस नाफेडच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ६९ नोव्हेंबर २०२३ पासून सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी व खरेदीला सुरुवात झाली असून सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विक्री करता येणार आहे.ही आहेत खरेदी केंद्र : यामध्ये चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औद्यो. सह. संस्था मर्या. चंद्रपूर, चंद्रपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, वरोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा आणि राजुरा व गडचांदूर येथील कोरपना तालुका सह. खरेदी विक्री संस्था मर्या. कोरपना ही खरेदी केंद्रे आहेत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांनी कळविले आहे.

CLICK TO SHARE