शेकडो कार्यकर्त्यांचा ईव्हीएम विरोधात उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

येत्या सर्व निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी बॅलेट पेपरने घेण्याची मागणी,अन्यथा ईव्हीएम मशिन फोडणारआंदोलन कार्यकर्त्यांचा निवेदनातून निवडणूक आयोगाला इशारा देसाईगंज देशात पार पाडल्या जात असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत होत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आढळून येत असुन याबाबत निवडणूक आयोगाकडे सबळ पुराव्यासह तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने विशिष्ट एका पक्षाला लाभ पोहचत आहे. यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून नागरीकांचे मुलभूत अधिकार हिरावले जात आहेत.ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता येत्या सर्व निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी बॅलेट पेपर घेण्याच्या मागणीला घेऊन देसाईगंज तालुक्यातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.दरम्यान या गंभीर बाबीची निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास ईव्हीएम मशिन फोडण्याचा इशारा ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीच्या वतीने देसाईगंज उपविभागीय कार्यालया मार्फत केन्द्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आला. देसाईगंज शहराच्या फव्वारा चौकातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून हा धडक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.यात देसाईगंज तालुक्यातील ओबीसी समाज संघटना, शिवसेना(उबाठा),समाजवादी पार्टी,गोटुल भुमी राणी दुर्गावती महिला मंडळ, समता सैनिक दल,मुस्लिम एकता, आर्यसत्य बौद्ध विहार,मिलिंद बौद्ध विहार,बौद्ध समाज कोअर कमिटी,भारत मुक्ती मोर्चा,आदिवासी विद्यार्थी संघाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केन्द्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ च्या ईव्हीएमने निवडणूका घेण्यासंदर्भात स्पष्ट निकाल दिला असुन ईलेक्ट्रानीक व्होटिंग मशिनने पारदर्श निवडणूका पार पाडल्या जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. असे असतांनाही घेण्यात आलेल्या निवडणूकांत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत कुठेच जुळवाजुळव होत नसताना निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन अद्यापही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.यावरून देशात एका विशिष्ट पक्षाला निवडुन आणण्यासाठी षडयंत्र रचले जात असुन यामुळे देशातील नागरीकांचे संविधानीक अधिकार धोक्यात आले आहेत.एवढेच नव्हे तर ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत सत्ताधारी भाजपाच्या चार अधिकाऱ्यांचे नाव आढळून आल्याने हेतुपुरस्सर सत्तेसाठी ईव्हीएमचा वापर होत असल्याचे चव्हाटय़ावर येऊ लागले आहे.ही अतिशय गंभीर बाब असल्याने निवडणूक आयोगाने जनभावना लक्षात घेता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने निवडणूका घ्याव्यात,अन्यथा ईव्हीएम मशिन फोडण्याचा ईशारा जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मोर्चाचे नेतृत्व ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचे अध्यक्ष पिंकु बावणे व सचिव सागर वाढई यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,छगन शेडमाके,इलास खान सुरेंद्र चंदेल,अविनाश गेडाम,कैलास वानखेडे,नंदु नरोटे,सुभोध मेश्राम मनोहर निमजे, ,नंदु चावला,पवन गेडाम,प्रदिप लाडे, साजन मेश्राम, जावेद शेख,आरिफभाई शेख, सुमेध मेश्राम, संतोष बहादुरे,आशिष घुटके, दिपक मेश्राम, मोहित अत्रे,धनंजय बांडे,प्रविण रामटेके,विजय पिल्लेवान,अनिल मडावी,दुष्यांत वाटगुरे,भिमराव नगराळे,कैलास वानखेडे,शंकर बेद्रे,दिपक मेश्राम, नरेश लिंगायत,शमा खान, रजनी आत्राम,पुजा ढवळे,मंदा उईके,मिना कोडापे आदी विविध पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जनआक्रोश मोर्चात सहभाग झाले होते.

CLICK TO SHARE