वसमत विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे जुलमी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

सोशल

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:वसमत सौ.प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस (महिला) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकाध्यक्ष राजाराम खराटे यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 6/2/2024 रोजी वसमत येथे शिवाजी पुतळ्यापासून शेतकऱ्यांच्या पिक विमा निधी मिळणे बाबत शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली आहे,तसेच गवळी मारुती मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले शिवाजी पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून शेतकऱ्यांचा पिक विम्याच्या मागणीसाठी मोर्चास सुरुवात झाली शिवाजी पुतळ्यापासून गवळी मारुती मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांचे मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या होत्या उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले मोर्चास शेतकरी स्वाभिमानी संघटना यांनी पाठिंबा दिला, व भीमशक्ती संघटना यांनी देखील पाठिंबा दिला त्यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी,काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष अजगर पाटेल, औंढाचे नगरसेवक अज्जूभाई इनामदार, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सारंग, हिंगोली जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम, शेख तोफिक, आबा कदम शिवा अहिरे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम ऋषिकेश बर्वे नारायण कदम सदाशिव सुदामराव ढोरे माधव कदम बापूराव गरड सोपानराव ढोरे गंगाधर पेंटर विठ्ठल कदम माणिकराव पांचाळ गंगाधर कुरकुडे ज्ञानेश्वर बोराडे नारायणराव माहीकर काशिनाथ कोरडे ज्ञानेश्वर सवंडकर गोपाळ दशरथे हरी पाटील लक्ष्मण कोरडे परसरामजी कदम किशन कदम माणिक मामा पांचाळ, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेविनीत:सौ. प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी(महिला)राजाराम खराटे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी ता.वसमत जिल्हा.हिंगोली

CLICK TO SHARE