काटोल विधानसभेत दि.७.०२.२०२४ रोजी गाव चलो अभियान शुभारंभ

अन्य देश

प्रतीनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण भारतभर गाव चलो अभियानाची सुरुवात घेत आहे. याच अनुषंगाने उद्या दि. ७.०२.२०२४ रोजी काटोल विधानसभेत श्री चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कोहळे ,निवडणूक प्रमुख श्री चरणसिंगजी ठाकूर,जिल्हामहामंत्री दिनेश ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात होत आहे.काटोल विधानसभेत २५० भाजपा पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ता म्हणून संपूर्ण काटोल विधानसभेत गावचलो अभियान करणार आहे, यात भाजपा निवडणूक प्रमुख श्री. चरणसिंगजी ठाकूर हे काटोल शहर तीन बूथ व काटोल तालुक्यातील भोरगड, रिधोरा, मा.आमदार डॉ. आशिष देशमुख, ढवळापूर, माळेगाव, जिल्हामहामंत्री दिनेश ठाकरे, मेंढेपठार बाजार, रामठी, व दिग्रस बु, राजुजी सरोदे, काटोल शहर व कोंढासावळी, उकेश चव्हाण यांनी खैरगाव, खरसोली, शहर अध्यक्ष काटोल विजय महाजन काटोल शहर, प्रफुलजी हवाले शेमडा गाव, तालुकाध्यक्ष नरखेड दिलेश ठाकरे अध्यक्ष हे आरंभी गाव तसेच तालुकाध्यक्ष निलेश पाटील धोटे येनवा गाव, शामराव बारई नरखेड शहर,वैशालीताई ठाकूर काटोल शहर, हेमंत कावडकर काटोल शहर व कोंढाली ,लक्ष्मी ताईजोशी काटोल शहर तसेच अनेक भाजपा पदाधिकारी यांना विविध गावात गावचलो अभियान करणार आहे अशी माहिती जिल्हामहामंत्री नागपूर ग्रामीण दिनेशजी ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संजय गांधी निराधार काटोल तालुका अध्यक्ष राजेंद्र सरोदे, काटोल शहर अध्यक्ष विजय महाजन, काटोल तालुकाध्यक्ष निलेश धोटे व नरखेड तालुकाध्यक्ष दिलेश ठाकरे,मोवाड शहर अध्यक्ष चेतन ठोंबरे, नरखेड शहरध्यक्ष राजेश क्षीरसागर, व कोंढाळी शहरध्यक्ष विशाल काळबांडे उपस्थित होते.

CLICK TO SHARE