जामगांव बू येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पुलाच्या कामाचे भूमिपूजन,रखडलेल्या कामाला गती

अन्य

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव

नरखेड:तालुक्यातील जामगांव बू येथे काल दिनांक 06/02/2024 रोजी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पुलाच्या कामाचे भूमिपूजन गावातील सरपंच सौ. प्रविणाताई ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी गावाला लागून असलेल्या नाल्याला जाण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री अंधारातून पाण्यातून जावे लागत होते.सततच्या ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत गावाला 10 लक्ष रू,मंजुरी मिळाली व काल कामाला सुुरूवात करण्यात आली.भुमिपूजनाला प्रामुख्याने डॉ.संजयजी ढोकणे,माजी सरपंच,दुर्योधनजी वरठे,माजी सरपंच,उपसरपंच प्रीतम मनकवडे,गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदिपजी काळमेंघ, प्रशांतजी ढोकणे,संजय भलावी,कैलास कुरणकर,विनोद बागडे,शंकर वरठे,विलास खंडार,तेजराव कोडपे,गौवधन वरठे,राजकुमार वाहने असे असंख्य गावकरी उपस्थित होते.

CLICK TO SHARE