शिरड शाहपुर येथील महाआरोग्य शिबिरात 465 जणांनी केली विविध आजाराची आरोग्य तपासणी

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

शिरड शाहपुर:- “योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी” या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून, ग्रामीण भागातील सर्व वयोवृद्धांना आता सर्व आजारावर मोफत आरोग्यसेवा मिळत असल्याने, वयोवृद्धासह सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यास मदत होत असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा क्षेत्रात सुरू केलेल्या या महाआरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व गरजूंनी या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करण्याचे वसमत तालुकाप्रमुख राजू चापके यांनी आवाहन केले आहे. या महाआरोग्य शिबिराला यावेळी उपस्थित, मा.जि.प. उपाध्यक्ष मिलिंद यंबल, वसमत तालुकाप्रमुख राजू चापके, सरपंच जितू रावले, मा. सभापती दिपक ढेकळे, शहरप्रमुख शिवराज रावले, सय्यद नाजिमा, मा..प.स. सदस्य शंकरराव आकमार, मा. सभापती रामकृष्ण झिंजुर्डे , मच्छिंद्रनाथ सोळंके, गुलाम नबी, वसंतराव पाटील, शिवहार महाराज, बद्रीनाथ कदम, शिवराज यशवंते, लक्ष्मण जोगदंड, विलास रावले, हरिभाऊ रावले, रामकिशन बोंगाणे, वसंत जाधव, राम बिचेवार, योगेश भालेराव, पांडुरंग शेळके, तुषार लांडगे, पंडित जोगदंड, शैलेश संगेवार, विठ्ठल आकमार, गजानन रावले, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून व खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने गोरेगाव येथील महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण 465 जणांनी विविध आजारांची तपासणी केली आहे. यामध्ये सिकलसेल 82 एच आय व्ही 31, सीबीसी 80, एच बी सी 61, बी एस एल 38 एल एफ टी 57, के एफ टी 42 आर बी एस 62, थुंकी 12, इतर रोग यामध्ये एकुण 465 यांनी तपासणी केली आहे. या सर्व रुग्णांना औषधोपचार व योग्य मार्गदर्शन डॉक्टरांच्या पथकाने केले.या महा आरोग्य तपासणी शिबिराला मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे ज्ञानेश्वर घोगरे, मारोती कल्याणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनुराधा गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय, बेंगाळ, डॉ.ओमकार कांबळे, डॉ . अंकिता अकमवार, डॉ अर्जुन गिते, डॉ नितीन सांगळे, पद्मिनी भुतनर, कल्पना ढाकरे, औषध निर्माण अधिकारी अरविंद खुपसे, रत्नदीप मुळे, आरोग्य मित्र राघिनी लोखंडे, यांच्या उपस्थितीत शिरड शाहपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक यांनी विशेष परिश्रम घेतले

CLICK TO SHARE