बल्लारपूरचे नवीन ठाणेदार आसिफराजा शेख यांनी स्वीकारला पदभार

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : घुग्घुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी काल बुधवार ७ फेब्रुवारीला रात्री बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची नागपूर ग्रामीणला बदली झाली. त्यांनी आपला पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तडी यांना देऊन पदमुक्त झाले. मागील ७ दिवसांपासून बल्लारपूर पोलीस स्टेशन प्रभारी च्या हाती होता. काल पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घुग्गुस चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची बल्लारपूर पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.त्यांनी काल बल्लारपूरचे पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.आसिफराजा शेख यांची ९ फेब्रुवारी २०२३ रोजी घुग्घुस पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एक जांबाज, दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते बल्लारपुरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालतात की जसे आहे तसे चालू द्या च्या धोरणावर काम करतात, याकडे बल्लारपूरच्या जनतेचे डोळे लागले आहेत.

CLICK TO SHARE